तालुक्यात दीड हजार वीज कनेक्शन कट

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : तालुक्यात महावितरणने थकबाकी वसुलीसाठी आक्रमक पाऊल उचलले असून, वीजबिल न भरणाऱ्या एक ह जार
५०० घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

तालुक्यातील एकूण १४ हजार ४८३ ग्राहकांकडे तब्बल चार कोटी ९३ लाख ४६ हजार रुपये थकबाकी प्रलंबित असल्याने ही कारवाई करण्यात आली. महावितरणच्या कन्नड विभागासमोर थकबाकीमुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून, अधिकारी व कर्मचारी आता गावोगावी जाऊन धडक कारवाई करत आहेत.

थकबाकीदार ग्राहकांनी कटू कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर बिले भरावीत, अन्यथा पुढील काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल.
-रमेश वाघचौरे, कार्यकारी अभियंता

काही ग्राहकांनी कारवाईच्या भीतीने थकबाकी भरून वीजपुरवठा सुरळीत करून घेतला असला, तरी अजूनही मोठी रक्कम येणे बाकी आहे. वारंवार सूचना देऊनही बिले भरली नाहीत, अशांचे कनेक्शन कापले आहे. यामध्ये केवळ घरगुतीच नव्हे, तर व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांचाही समावेश आहे. आतापर्यंत दीड हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे.